‘ऑरबीट’च्या मदतीने इंडस ११ शिमला मिरचीचे महिन्यात ३१ टन उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:21+5:302021-05-05T04:42:21+5:30

फेब्रुवारी महिन्यात राजमाने यांनी शिमला मिरचीची लागवड केली. सुरुवातीला दीड एकरमध्ये ५ फुटी बेड तयार केले. मलचिंग करून व ...

With the help of Orbit, Indus 11 Capsicum produces 31 tons per month | ‘ऑरबीट’च्या मदतीने इंडस ११ शिमला मिरचीचे महिन्यात ३१ टन उत्पादन

‘ऑरबीट’च्या मदतीने इंडस ११ शिमला मिरचीचे महिन्यात ३१ टन उत्पादन

googlenewsNext

फेब्रुवारी महिन्यात राजमाने यांनी शिमला मिरचीची लागवड केली. सुरुवातीला दीड एकरमध्ये ५ फुटी बेड तयार केले. मलचिंग करून व ड्रीप करून दीड फुटांवर झिगझॅग पद्धतीने रोपे लावली. रोपे लावल्याच्या दुसऱ्या दिवसांपासून ऑरबीट क्रॉप सायन्सेसची पिकांना पूरक खते व कीटकनाशके, बुरशीनाशके दिली.

पीक घ्यावयाच्या ८ ते १० दिवस आधी फवारणीद्वारे फळाचे वजन व जाडी वाढवण्यासाठी व पिकाला चकाकी येण्यासाठी ऑरबीट क्रॉप सायन्सेसची उत्पादने वापरली. ३८ व्या दिवशी पहिला तोडा १.५ टनांचा झाला. दुसरा तोडा ८ टनांचा झाला. आजअखेर त्यांनी ३१ टन शिमला मिरचीचे उत्पन्न घेतले आहे. अजूनही दोन अडीच महिने उत्पन्न चालूच राहील, असे राजमाने यांनी सांगितले. शिमला मिरचीचा ३५ रुपयांवर गेलेला दर लॉकडाऊनमुळे १७ ते १८ रुपये आहे. इंडस ११ शिमला मिरचीचे असे भरघोस उत्पन्न घेण्यात वाटेकरी चंद्रकांत गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

फोटो : ०३ ग्राम १

ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे हेमंत राजमाने यांनी इंडस ११ शिमला मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.

Web Title: With the help of Orbit, Indus 11 Capsicum produces 31 tons per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.