कामेरी येथे मनसेच्या वतीने अरविंद कदम यांच्या हस्ते आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजित भाळवणे, सौरभ भाळवणे, डॉ. नितीन चिवटे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना जंतुसंसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या वाळवा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातीळ वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे ,आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, औषध निर्माता यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अभिजित भाळवणे, तालुका अध्यक्ष उदयसिंह पाटील, भाऊसाहेब पाटील, वैभव पाटील, तालुका उपाध्यक्ष माळी, दीपक जाधव, आकाश अहिर, अरविंद कदम, सतीश पवार इस्लामपूर, शहर सचिव श्रीमंत जाधव, शहर अध्यक्ष सनी खराडे, राजकुमार सावळवाडे, सचिन रकटे, सुमित वाटेगावकर, निरंकार बंडे, सचिन कदम, सौरभ भाळवणे, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.