वाटेगाव येथील प्रथम एचपी गॅस कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : गेल्या वर्षी अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटात संपूर्ण जग ठप्प झाले. जनजीवन विस्कळीत झाले. अशा अडचणींच्या काळातही वाटेगावमधील प्रथम गॅस एजन्सी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील लोकांना घरोघरी गॅस पोहोचवून जनतेची सेवा केली, ही त्यांची लढाऊवृत्ती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक गजेंद्र सुनहरे यांनी केले.
हिंदुस्तान पेट्रोलियम एलपीजी गॅस डिलर संघटना सोलापूर यांच्यावतीने वाटेगावच्या (ता. वाळवा) प्रथम गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सांगली विक्री विभागाचे वरिष्ठ विक्री अधिकारी राहुल पाटील, सोलापूर विभागाचे शरद गडवाल, नांदेड विक्री विभागाचे कौशल खंडेवाल, अभय कोचर यांच्यासह सात जिल्ह्यांतील वितरक उपस्थित होते. हरी लोहार, महादेव काळे, सुनील शेटे, अस्लम मुल्ला, प्रवीण कुंभार, अधिक नाईकडे, सिद्धीक नदाफ, अक्षय गोडसे, रोहित मुळीक, रमेश करांडे, नारायण साळुंखे, दस्तगीर मुल्ला, अरुण साळुंखे यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.