कसबे डिग्रजमध्ये घरोघरी सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:27 AM2021-05-18T04:27:08+5:302021-05-18T04:27:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे दक्षता समितीने सहा पथकाच्या मध्यमातून प्रत्येक घरात जाऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे दक्षता समितीने सहा पथकाच्या मध्यमातून प्रत्येक घरात जाऊन आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावातील अडीच हजार घरांतून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
कसबे डिग्रज येथे कोरोना रुग्ण वाढत असताना आशा सेविकांना मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल गण उपलब्ध नव्हते, कोरोना रुग्णाच्या घराला फलक नव्हते, कंटेन्मेंट झोन नव्हते. यावर नाराजी व्यक्त करत नोडल अधिकारी वर्षा पाटील यांनी आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली होती.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आशा सेविकांना ऑक्सिमीटर, थर्मल गणसह साहित्य उपलब्ध करून दिले. दक्षता समितीने नवीन शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे पथक तयार केले आणि घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केले.
तंटामुक्ती समिती अध्यक्ष आनंदराव नलवडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चोगुले, ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे, तलाठी के. एल. रुपनर, उपसरपंच सागर चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. शरद कुंवर, आरोग्यसेवक मनोज कोळी, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य या कामासाठी सक्रिय झाले आहेत.