करगणीत महिलांसाठीचे कोविड रुग्णालय आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:00+5:302021-05-15T04:25:00+5:30

करगणी : राज्यातील पहिले महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून उमेश पाटील यांनी करगणीत उभारले ...

Ideal for Kovid Hospital for women in Kargani | करगणीत महिलांसाठीचे कोविड रुग्णालय आदर्शवत

करगणीत महिलांसाठीचे कोविड रुग्णालय आदर्शवत

Next

करगणी

: राज्यातील पहिले महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून उमेश पाटील यांनी करगणीत उभारले आहे. हे कोविड सेंटर आदर्शवत ठरेल, असे मत विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केले.

करगणीतील आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून महिला कोविड सेंटर उमेश पाटील यांनी सुरू केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. करगणी परिसरातील माता भगिनींसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याचा वेगळा उपक्रम उमेश पाटील यांच्या प्रयत्नातून करण्यात आला आहे.

उमेश पाटील यांनी या कोविड सेंटरच्या माध्यमातून मोफत सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले. १०० बेडचे नियोजन असून, सध्या ४८ बेड्स तयार आहेत. पैकी १९ ऑक्सिजनचे बेड आहेत.

सध्या तालुक्यातील कोरोना संसर्गजन्य रुगणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. यासाठी आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नावाने महिला कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

यावेळी शरद पाटील, विनायक मासाळ, विजयसिंह पाटील, उत्तम माने, भारत पाटील, श्रीधर खिलारी, बाळू करांडे, दुर्योधन पाटील, आत्माराम सरगर, बरकत शेख, नवाज जमादार, भगवान म्हारगुडे, बळवंत म्हारगुडे, बाळू काळे, नेताजी मलमे, अनिल शेठ आदी उपस्थित होते.

Web Title: Ideal for Kovid Hospital for women in Kargani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.