कामेरीत गरज पडल्यास लॉकडाऊन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:07+5:302021-06-19T04:19:07+5:30
कामेरी : कामेरीत कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी गरज पडल्यास लॉकडाऊन वाढवा. रुग्णांच्या सान्निध्यात आलेल्या नागरिकांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली, ...
कामेरी : कामेरीत कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी गरज पडल्यास लॉकडाऊन वाढवा. रुग्णांच्या सान्निध्यात आलेल्या नागरिकांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली, तर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी त्याची परत अँटिजन टेस्ट करा. तोपर्यंत त्यांना घराबाहेर न पडण्याची सूचना करा. यापुढे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
कामेरी (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण केंद्राला शुक्रवारी मंत्री पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जास्तीत जास्त लोकांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवा. त्यांची चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करा, अशी सूचना केली. यावेळी विलगीकरण केंद्रात ३० रुग्णांची व्यवस्था होऊ शकते, असे दक्षता समितीने सांगितले. त्यावर तत्काळ कर्मवीर शिक्षण संस्थेने आपला हॉल देण्याची तयारी दर्शविली. या ठिकाणी २० रुग्णांची व्यवस्था होऊ शकते, असे प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. एस. कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, पंचायत समिती सदस्या सविता पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, बाळासाहेब पाटील, सुनील पाटील, नंदूकाका पाटील, शहाजी पाटील, एम. के. जाधव उपस्थित होते.