ऑनलाईन कथावाचन उपक्रमात मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 03:48 PM2021-04-19T15:48:18+5:302021-04-19T15:58:17+5:30

Wildlife Leopard Sangli : कोरोनामुळे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेल्या आय.यु.सी.इन ग्लोबल युथ समित ( IUCNGlobal Youth Summit 2021) या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या कथावाचन उपक्रमात शिराळा मधील प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती सादर केली. या परिषदेत १२० देशातील बारा हजारपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. सेंटर फॉर लार्ज लँडस्केप कंझर्वेशन या संस्थेने आयोजित केलेल्या रहा कथा वाचन उपक्रमात होता.१३ देशातून कथांची निवड करण्यात आली होती. 

Information on human-leopard coexistence in online storytelling activities | ऑनलाईन कथावाचन उपक्रमात मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती

ऑनलाईन कथावाचन उपक्रमात मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती

Next
ठळक मुद्दे ऑनलाईन कथावाचन उपक्रमात मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती शिराळा मधील प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील यांचा सहभाग

विकास शहा

शिराळा  : कोरोनामुळे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेल्या आय.यु.सी.इन ग्लोबल युथ समित ( IUCNGlobal Youth Summit 2021) या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या कथावाचन उपक्रमात शिराळा मधील प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती सादर केली. या परिषदेत १२० देशातील बारा हजारपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. सेंटर फॉर लार्ज लँडस्केप कंझर्वेशन या संस्थेने आयोजित केलेल्या कथा वाचन उपक्रमात होता.१३ देशातून कथांची निवड करण्यात आली होती. 

नुकत्याच जाहीर झालेल्या २०१८ च्या बिबट अहवालानुसार , २०१४ च्या गणनेच्या तुलनेत देशात बिबट्यांच्या संखेत ६० % ने वाढ झाली आहे व देशात १२८५२ पेक्षा जास्त बिबटे आहेत.पूर्वी बिबट्याचे वास्तव्य जंगली भागात होते, परंतु जंगलाशेजारील बदलत्या शेतीमुळे त्यांचा वावर जंगलाबाहेर होत गेला. ऊस, मका, ज्वारी अश्या उंच व घनदाट वाढणाऱ्या पिकांचा आसरा घेत लोकवस्तीजवळ त्यांचा वावर सुरू झाला.

गावात, लोकवस्तीत असणाऱ्या मोकाट असलेले कुत्रे , डुक्कर , शेळी , मेंढी, रेडकू किंवा वासरू, मांजर अश्या आकाराने लहान प्राण्यांचा समावेश त्याच्या खाद्यात होत गेला. हे मुबलक उपलब्ध व सहज पकडता येणारे खाद्य मिळाल्याने त्याचे वास्तव्य लोकवस्तीच्या जवळ वाढू लागले. यामुळे बिबट्यांची संख्या वाढली हे नक्की . परंतु बिबट हा आपल्या गावात अढळणाऱ्या कोल्हा, लांडगा, डुक्कर, मोर, ससा यासारखाच एक वन्यजीव आहे. गावा जवळील डोंगर व शेती हा त्याचा अधिवास झाला आहे.
भारतामध्ये बिबट्याला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्याला व त्याच्या अधिवासाला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहचवणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो.

शिराळा मध्ये प्रादेशिक वनविभाग तसेच चांदोली वनविभाग यांच्या सोबत प्लॅनेट अर्थ फौंडेशन यांनी तालुक्यात " वन्यजीव आपत्कालीन सेवा " केली आहे . यामध्ये बिबट्या सोबत इतर सर्वच वन्यजीव , वनविभाग आणि ग्रामीण लोक यांच्या मध्ये दुवा बनून सहजीवन साधने हे ध्येय आहे . त्यामध्ये कोव्हिड चे नियम पाळत विविध जनजागृती कार्यक्रम घेतले जातात , विविध गावामध्ये लोकप्रतिनिधी सोबत सभा - चर्चासत्र घेऊन ग्रामीण भागातील निसर्ग संवर्धन व समाज विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातात. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत जखमी वन्यजीवांचा बचाव व उपचार करणे, त्यांना सुखरूप त्यांच्या अधिवासात परत सोडणे असे प्रयत्न केले जातात. पुढे व्यवस्था तालुका आणि जिल्हा पातळीवर राबविण्याचा मानस आहे. आय.यु.सी.इन ( IUCN ) च्या कथावाचन उपक्रमात शिराळामधील मानव - बिबट सहजीवनाची ही गोष्ट उपस्थित सर्व सहभागी सदस्यांना खूप आवडली व त्यांनी खूप कौतुकही केले .

या कथेसाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी सुशांत काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी.इन.पाटील, देवकी तासीलदार, बाबा गायकवाड, चांदोली वनविभागानेचे वनाधिकारी गोविंद लांगोटे, वनपाल यमगर , जे.बी.महाडिक, सांगली जिल्हा मानद वन्यजीव सदस्य अजितकुमार पाटील, संस्थेतील अनुभवी सदस्य व उपाध्यक्ष प्रणव महाजन, प्रभाषिनी मोहापात्रा यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Information on human-leopard coexistence in online storytelling activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.