संक्रमण रोखण्यासाठी संस्थात्मक विलगीकरण सर्वोत्तम पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:20 AM2021-05-28T04:20:57+5:302021-05-28T04:20:57+5:30
कडेगाव : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लोकसहभागातून संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करणे, हा सर्वोत्तम पर्याय आहे. ज्या गावांमध्ये ...
कडेगाव : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लोकसहभागातून संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करणे, हा सर्वोत्तम पर्याय आहे. ज्या गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू झाले आहे, त्या केंद्राच्या व्यवस्थापन समित्यांनी तेथे दाखल रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
चिंचणी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीने श्री शिवाजी हायस्कूल येथे लोकसहभागातून सुरू केलेल्या डॉ. पतंगराव कदम संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे लोकार्पण विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी उपस्थित होते.
विश्वजित कदम म्हणाले, ज्या रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परंतु लक्षणे दिसत नाहीत किंवा अगदीच सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांना गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने आग्रह धरावा.
फोटो ओळ :
चिंचणी (ता. कडेगाव) येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील उपस्थित होते.