इस्लामपूर -परांडा बसफेरी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:59+5:302021-03-28T04:25:59+5:30
दोन दिवस ही बस सकाळी अकरा वाजता इस्लामपूर आगारातून सुटेल. ही बस सांगली, मिरज पंढरपूर, कुर्डुवाडी, परांडा, आवटी ...
दोन दिवस ही बस सकाळी अकरा वाजता इस्लामपूर आगारातून सुटेल. ही बस सांगली, मिरज पंढरपूर, कुर्डुवाडी, परांडा, आवटी अशी जाईल. मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. त्याच मार्गे परत येईल. परांडा, आवटी या ठिकाणी ‘वलीबाबा’ यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन ही बस सुरू करण्यात आली आहे.
सहायक वाहतूक अधीक्षक सुनंदा ए. देसाई, कार्यशाळा अधीक्षक शरद धनवडे, वाहतूक निरीक्षक एम. डी. ढेरे, प्रवासी मित्र गुलाब मुल्ला, चालक मित्र हारुण एस. पटेल, प्रमुख कारागीर श्रीरंग साठे, अनिल पाटील, कामगार नेते दादासाहेब सपकाळ, सुरेंद्र सूर्यवंशी, अमित पाटील हे या फेरीचे संयोजन करत आहेत.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही बसफेरी भविष्यात नियमित करण्याचे नियोजन करीत आहोत. परिसरातील सर्वच प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक श्रीमती घोलप -पाटील यांनी केले आहे.
फोटो ओळ - इस्लामपूर -परांडा बसफेरीला प्रारंभ करताना आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा घोलप -पाटील, हारुण पटेल, शरद धनवडे, अनिल पाटील.