कापूर ओढा २५ वर्षांनी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 03:59 PM2019-10-12T15:59:30+5:302019-10-12T16:00:14+5:30

तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील मांजर्डे, पेड, मोराळे, हातनूर, आरवडे, बलगवडे परिसराला  पावसाने झोडपून काढले. मांजर्डे येथे कापूर ओढ्याचे पाणी २५ वर्षांनी पात्राबाहेर पडले. ओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे.

Kapoor pull out after 3 years | कापूर ओढा २५ वर्षांनी पात्राबाहेर

कापूर ओढा २५ वर्षांनी पात्राबाहेर

Next
ठळक मुद्देकापूर ओढा २५ वर्षांनी पात्राबाहेरओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान

मांजर्डे : तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील मांजर्डे, पेड, मोराळे, हातनूर, आरवडे, बलगवडे परिसराला  पावसाने झोडपून काढले. मांजर्डे येथे कापूर ओढ्याचे पाणी २५ वर्षांनी पात्राबाहेर पडले. ओढ्यानजीकची घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे.

मांजर्डे येथे कापूर ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. ओढ्याच्या पात्राबाहेर पाणी आले. गावालगत ओढ्याकाठी असणारे अनेक दुकानगाळे व घरांमध्ये पाणी शिरले आहे. गावातील यल्लम्मा मंदिरातही पाणी शिरले आहे. यामुळे अनेक ग्रामस्थांची तारांबळ उडाली. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य बुडाले आहे.

या भागातील सर्वच गावात विक्रमी पाऊस झाला. आरवडे येथे जोरदार झालेल्या पावसामुळे गावालगतचा ओढा भरून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत लोकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. वस्ती भागात राहणाऱ्या लोकांना गावातच ताटकळत राहावे लागले.

Web Title: Kapoor pull out after 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.