चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:27+5:302021-05-15T04:25:27+5:30
ओळ : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक, शिवसेना नेते अभिजीत पाटील, ...
ओळ : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक, शिवसेना नेते अभिजीत पाटील, जि. प. सदस्य संजीवकुमार पाटील, सरपंच कमल पांढरे, माजी सरपंच कृष्णात पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णालय सुरू झाल्यामुळे परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिकुर्डे (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नाईक म्हणाले, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णालय सुरू झाल्यामुळे परिसरातील लोकांची खूप दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. या रुग्णालयामुळे चिकुर्डेसह ठाणापुडे, देवर्डे, डोंगरवाडी, शेखरवाडी, जक्राईवाडी, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, येलूर, ऐतवडे खुर्द, लाडेगाव, येलूर, तांदूळवाडी आदी गावांसह परिसरातील नागरिकांची साेय झाली आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरू होण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली आहे.
डॉ. साकेत पाटील म्हणाले, या रुग्णालयामध्ये सध्या एकूण २८ बेड असून, त्यापैकी १२ बेड ऑक्सिजनचे आहेत. १६ इतर बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
याप्रसंगी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, शिवसेना नेते अभिजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, लक्ष्मी उद्योग समूहाचे संस्थापक दिलीप खांबे, सरपंच कमल पांढरे, उपसरपंच उत्तम पाटील, माजी सरपंच कृष्णात पवार, तंटामुक्ती अध्यक्ष दौलत पवार, जयराम अनुसे, दीपक वाघमारे, देवर्डेचे उपसरपंच संजयकुमार पाटील, बाबासोा खोत, शामराव पाटील, अनिल चिवटे, बाळासोा पाटील, चांदसोा तांबोळी, पोलीस पाटील सुधीर कांबळे, अमृतकुमार पांढरे आदी उपस्थित होते.