शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते पिछाडीवर, जिल्हा प्रशासन आघाडीवर; १०० टक्के विजयाचा आत्मविश्वास

By संतोष भिसे | Published: April 07, 2024 6:17 PM

...पण निवडणूक आयोगाने मात्र प्रचाराच्या शर्यतीत आघाडी घेताना घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

सांगली : सांगली लोकसभेच्या प्रचाराचे रणांगण अद्याप तापले नसल्याने नेतेमंडळी वैयक्तिक भेटीगाठींवरच भर देत आहेत. सभासमारंभांना हजेरी, वाढदिवसाच्या शुभेच्छा असा हलका प्रचार करीत आहेत. पण निवडणूक आयोगाने मात्र प्रचाराच्या शर्यतीत आघाडी घेताना घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

मते मिळविण्यासाठी उमेदवारांकडून आश्वासने आणि आमिषे दाखवली जात असली, तरी प्रशासन मात्र प्रबोधनाच्या भूमिकेत आहे. विविध स्पर्धा, महिलांसाठी कार्यक्रम, रांगोळी व निबंध स्पर्धा, मतदानाचे आवाहन करणारे फलक याद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. मतदान हे अधिकाराबरोबरच कर्तव्यदेखील असल्याचे सांगत आहे. मतदान यंत्राची प्रात्यक्षिके दाखवून मतदारांशी जवळीक साधली जात आहे. यासाठी स्वीप मोहीम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत विटा येथे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. तासगाव तालुक्यात रांगोळी स्पर्धा झाल्या. सांगलीत क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. पलूस येथेही रॅली काढण्यात आली.

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो असे आवाहन करीत लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. आयोगाचे प्रतिनिधी वाड्या-वस्त्यांवर, आठवडी बाजारात, गर्दीच्या ठिकाणी, महाविद्यालयांत पोहोचून प्रचार करीत आहेत. पेट्रोल पंप, एसटी बसस्थानक, बसेस, टपाल कार्यालये, चावडी, मंगल कार्यालये, मोठे समारंभ आदी ठिकाणी पोस्टर, स्टीकर, ऑडिओद्वारे प्रचार सुरु आहे. उमेदवार जशी प्रचारपत्रे देतात, तशीच मतदारांकडून संकल्प पत्रे भरुन घेण्यात येत आहेत.

खुद्द जिल्हाधिकारीच प्रचारातनिवडणूक आयोगाच्या प्रचार मोहिमेत खुद्द जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी हे स्वत: उतरले आहेत. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.

विरोधकाचे आव्हान मोठेनिवडणूक आयोगाला टक्कर देणारा प्रमुख विरोधक म्हणून उन्हाळ्याचा विचार करावा लागत आहे. यंदा निवडणूक ऐन उन्हाळ्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला आहे. ७ मे रोजी मतदानावेळी तो आणखी किती वाढेल? याची चिंता प्रशासनाला आहे. अशा रणरणत्या उन्हात मतदारांना प्रचारासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. पण मतदानाच्या जास्तीत जास्त टक्केवारीद्वारे ही लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास प्रशासनाला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक