मेणी जल सेतुला गळती, लाखो लिटर पाणी वाया, सिंचन विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:27 PM2021-03-15T18:27:04+5:302021-03-15T18:30:28+5:30
Water Dam Sangli- खूजगाव (ता.शिराळा) जवळील मेणी जलसेतु मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे याचबरोबर येथील शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान होत आहे. ही गळती काही वर्षांपासून सुरू आहे मात्र याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत आहे.
विकास शहा
शिराळा : खूजगाव (ता.शिराळा) जवळील मेणी जलसेतु मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे याचबरोबर येथील शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान होत आहे. ही गळती काही वर्षांपासून सुरू आहे मात्र याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत आहे.
चांदोली धरणातुन सध्या रब्बी पिकाच्या शेती साठी पाणी सोडण्यात आले असुन या वर्षीचे हे पहीलेच आर्वतन आहे. याचा कालावधी सात ते आठ दिवसाचा असतो परंतु शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी कोकरुड जाणाऱ्या मुख्य मार्गावर खुजगांव जवळील मेणी जलसेतुला जे जाईन्ट रबर वापरण्यात आले आहेत ते रबर जिर्ण झाल्याने पाण्याच्या प्रेशरने फाटले असुन सध्या यातुन लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
परंतु ते दुरुस्त न करता कालव्यातुन पाणी सोडण्यात येत आहे. कालवा गळती व दुरुस्ती सिंचन विभागाने केली नसल्याने
शेतकर्यांतुन प्रंचड संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी दि.११मार्च रोजी मध्यरात्री जल सेतुच्या डाव्या बाजुचे जॉईन्ट रबर तुटले तर शुक्रवारी सकाळी उजव्या बाजुचे रबर तुटले यामुळे जल सेतुला मोठे भगदाड पडले.
उत्तर भागात ऐन दुष्काळ जण्य परस्थितीत पाण्याची मागणी असताना लाखो लिटर पाणी वाहुन जात आहे,हेच पाणी शेतकर्यांच्या उभ्या पिकात पडत असुन पिकांना धोका निर्माण झाला आहे.पडलेले पाणी परिसरातील शेतीत पसरले आहे.याच ठिकाणाहुन शेडगेवाडी, शिराळा,शेडगेवाडी कोकरुड मार्गे मलकापुर,रत्नागिरी,कोल्हापूर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ सुरु असते.
त्यातच या जलसेतुजवळ धोकादायक वळण असल्याने छोटे मोठे अपघात होऊन काही वहानधारकांना अपंगत्व आले आहे.तर काहींना जिव गमवावा लागला आहे. परंतु वाहन धारक ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी थाबंत आहेत.
संबंधीत विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन मेणी जलसेतुची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकर्यांची असुन , संबंधीत विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन मेणी जलसेतुची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.प्रशासनाला कधी जाग येणार अशी विचारना ही या वेळी धबक्या आवाजात सुरु आहे.
शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी कोकरुड जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खुजगांव जवळील मेणी जलसेतुची दुरुस्ती मागील वीस वर्षांन पासुन केलेली नसल्याचे स्थानिक शेतकर्यांचे मत आहे.पांटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत असुन फक्त बघ्याची भुमिका घेत आहे.
पाटबंधारे विभागाशी याबाबत विचारणा केली असता ,उत्तर विभागातील शेतकर्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या असुन मागणी वरुन पाणी सोडले आहे. सदर रबर जाईन्ट पाण्याच्या व पंप हाऊसच्या प्रेशरने तुटले असुन आम्ही हे आवर्तन रविवारी बंद करुन याची दुरुस्ती करणार आहे .
एस.ए. मुजावर,
कनिष्ठ अभियंता ,पाटबंधारे, कोकरुड