शिरटे : क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत जन्मल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या जन्मभूमीचा वारसा मी माझ्या कर्तृत्वातून कर्मभूमीत साकारेन. गावच्यावतीने झालेला हा सत्कार मायेचा सत्कार असल्याचे मत नूतन सरपंच स्वाती पोळ यांनी व्यक्त केले.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे तासगाव तालुक्यातील सावळज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल स्वाती पोळ यांनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी जन्मभूमीतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. ग्रा. पं. सदस्या सुनीता मोहिते व दीपा पाटील यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच गणेश हराळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जयसिंग पाटील, अमोल पोळ, मच्छिंद्रनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पाटील, बाबूराव पाटील, क्रांतिसिंह सोशल फौंडेशनचे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, सचिव संदीप पाटील, रमेश पाटील, संदीप स्वामी, रमेश हराळे, जयवंत पाटील उपस्थित होते.
फोटो-१३शिरटे१
फोटो ओळ : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे स्वाती पोळ यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गणेश हराळे, अमोल पोळ, सुनीता मोहिते, जयसिंग पाटील उपस्थित होते.