शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:06+5:302021-07-18T04:19:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : शिक्षकांचे रखडलेले प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू तसेच विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : शिक्षकांचे रखडलेले प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू तसेच विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
आमदार आसगावकर यांनी शनिवारी कवठेमहांकाळ येथे भेट दिली. यावेळी कवठेमहांकाळ येथील शिक्षक नेते प्रा. शिवाजी ओलेकर यांच्या हस्ते कवठेमहांकाळ तालुक्यातील शिक्षकांच्यावतीने आमदार आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आसगावकर बोलत होते.
प्रा. शिवाजी ओलेकर यांनी शिक्षकांची जुनी पेन्शन योजना सुरू करावी, विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, इत्यादी मागण्या आमदार आसगावकर यांच्याकडे केल्या. त्यावर आमदार आसगावकर यांनी लवकरच हे दोन्ही प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी नागेश ओलेकर, बाळासाहेब ओलेकर, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.