शिवप्रताप अॅग्रोमध्ये शेतकऱ्यांसाठी शनिवारी कर्ज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:25+5:302020-12-31T04:26:25+5:30
विटा : येथील शिवप्रताप अॅग्रोटेक कंपनी आणि आरबीएल बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने विटा येथे शनिवार, दि. २ जानेवारीला शेतकरी कर्ज ...
विटा : येथील शिवप्रताप अॅग्रोटेक कंपनी आणि आरबीएल बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने विटा येथे शनिवार, दि. २ जानेवारीला शेतकरी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवप्रतापचे संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांनी दिली.
ते म्हणाले, यावर्षी पाऊसपाणी चांगले आहे. टेंभू योजनेचे पाणी सर्वत्र फिरलेले आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतीत मोठी सुधारणा करीत आहे. बरेच क्षेत्र ओलिताखाली येऊ लागले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करणे गरजेचे आहे. रत्नाकर बॅँकेच्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. द्राक्षबागेला साडेतीन लाख रूपये, तर उसाला एकरी १ लाख २० हजार रूपयांचे कर्ज दिले जात आहे. त्यासाठी जामीनदाराची गरज नाही. घरातील एका महिला सदस्याची मान्यता घेऊन कर्ज दिले आहे. तसेच मॉर्गेजही करावे लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज स्वस्त पडत आहे.
सध्या कॅश क्रेडिटने कर्ज दिले जात असून परतफेडही सुलभ केली आहे. प्रत्येक वर्षाला केवळ कर्जाचे व्याज भरावयाचे आहे. पाच वर्षे झाल्यानंतर संपूर्ण कर्ज भरावयाचे आहे. शेतीव्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे घेतली जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कर्जमेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतापराव साळुंखे यांनी केले.
शिवप्रताप अॅग्रोटेकचे अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे यांनी, शिवप्रताप ही शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेती विकासाची चळचळ उभी करण्याचा प्रतापराव साळुंखे यांचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शनिवारी विटा येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात हा कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले.
फोटो - ३०१२२०२०-विटा-प्रतापराव साळुंखे. यांचा फोटो वापरणे.
फोटो - ३०१२२०२०-विटा-विठ्ठलराव साळुंखे. यांचा फोटो वापरणे.