भगवान महावीर कोविड रुग्णालय पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:56+5:302021-04-15T04:24:56+5:30
सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने येथे सुरू केलेल्या भगवान महावीर कोविड रुग्णालयातून २७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...
सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने येथे सुरू केलेल्या भगवान महावीर कोविड रुग्णालयातून २७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता दुसरी लाट सुरू झाली असून पुन्हा हे रुग्णालय सुरू करीत असल्याची माहिती समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या सहकार्याने लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात भगवान महावीर कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांचे सहकार्य आहे. प्रशासनाची मंजुरीही मिळाली आहे. प्रारंभी ३० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्यामध्ये १५ खाटा आयसीयू व्हेंटिलेटर व १५ खाटा ऑक्सिजनयुक्त असतील. रुग्णांसाठी मोफत शाकाहारी भोजन व्यवस्था, डॉ. पवन गायकवाड यांच्याकडून रुग्णांचे मानसिक समुपदेशन व आरोग्य प्रबोधन उपक्रम राबविण्यात येणार आहे. डाॅ. वैशाली कोरे, डॉ. नीरज व डॉ. दिनेश भबान, डॉ. राहुल पाटील, डॉ. प्रीतम आडसुळे, डॉ. बी.एस. पाटील, डॉ. अमोल सकळे व डॉ. अमोल पाटील सेवा देणार आहेत.
यावेळी सुभाष बेदमुथा, जितेंद्र जैन नाणेशा, मनोज पाटील, अजित पाचोरे, वसंत पाटील, सुभाष देसाई, राजगोंडा पाटील, ए.बी. पाटील, आदिनाथ उपाध्ये, महावीर भन्साळी उपस्थित होते.