. सांगली : अस्थिरतेच्या राजकीय वातावरणात जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी अस्तित्वासाठी एका रात्रीत पक्ष आणि निष्ठा बदलल्या. उमेदवारी मिळविण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपारपर्यंत इच्छुकांची मॅरेथॉन स्पर्धा रंगली होती. काहींची धावपळ कामी आली, तर अनेकांची नुसतीच दमछाक झाली. शनिवारी दुपारी सर्वच पक्षांच्या याद्या निश्चित झाल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक इच्छुक अधांतरी राहिले. यातील काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची शनिवारी शेवटची मुदत असल्याने उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यासाठी एकच धावपळ सुरू होती. रात्रभर पक्षाचे नेते, पदाधिकारी जागरण करून याद्यांचे काम करीत राहिले. याद्या निश्चित करताना राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची सर्वाधिक दमछाक झाली. पहाटेपर्यंत बैठका सुरू होत्या. कॉँग्रेसच्या मिरजेतील नावावर रात्री साडेबाराला शिक्कामोर्तब झाले. तरीही रुसवाफुगवीचा खेळ थांबला नाही. शनिवारी दुपारपर्यंत मिरजेतील कॉँग्रेसअंतर्गत वातावरण तापले होते. सी. आर. सांगलीकरांना उमेदवारी मिळावी म्हणून बहुतांश नगरसेवक, सांगली, मिरजेतील प्रमुख नेतेमंडळींची ताकद लागली होती. सिद्धार्थ जाधव यांच्या उमेदवारीनंतर कॉँग्रेसमध्ये नाराजी पसरली. शनिवारी सांगलीकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कॉँग्रेसने तासगाव-कवठेमहांकाळमधून सुरेश शेंडगे यांना, तर जतमधून विक्रमसिंह सावंत यांना उमेदवारी दिल्यानंतरही अन्य इच्छुकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर होता. सांगलीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठीही घडामोडी झाल्या. दिनकर पाटील आणि सुरेश पाटील यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर नेते व पदाधिकाऱ्यांनी सुरेश पाटील यांना उमेदवारी दिल्याने दिनकर पाटील समर्थकांत नाराजी होती. दिनकर पाटील यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली. जतचे आ. प्रकाश शेंडगे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला आहे. स्वाभिमानीला केवळ इस्लामपूरची जागा मिळाल्याने तासगाव-कवठेमहांकाळ येथून इच्छुक असलेले ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते महेश खराडे यांनी लगेच पक्ष बदलला आणि शिवसेनेकडून उमेदवारी मागितली. शिवसेनेने ती दिलीही! आघाडी, महायुती तुटल्यानंतर बहुतांश इच्छुकांचे उमेदवारीचे स्वप्न साकार झाले असले, तरी प्रत्येक मतदारसंघात तिकीट न मिळाल्याची नाराजी दिसून आली. उमेदवारीच्या शर्यतीत पक्षत्याग करणाऱ्यांमध्ये सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. एकही प्रमुख पक्ष या डोकेदुखीतून सुटला नाही. (प्रतिनिधी) ४सांगलीतील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील आणि कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे हे दोघेही एकाचवेळी अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंड करण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. अद्याप दोघांनीही स्पष्ट भूमिका जाहीर केली नसली, तरी उघडपणे त्यांनी पक्षीय निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दोघांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. ४सांगलीतून दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे, कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, जतमधून सुरेश शिंदे, मिरजेतून सी. आर. सांगलीकर, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख दावेदार पक्षीय उमेदवारीपासून वंचित राहिले. यातील काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांची बंडखोरी शांत करण्याची संधी प्रत्येक पक्षाकडे आहे. त्यानंतर बंडखोरांचे जिल्ह्यात कितपत आव्हान असणार, याचे चित्र स्पष्ट होईल. मतदारसंघ कॉँग्रेसराष्ट्रवादीभाजप शिवसेना मनसे इतर सांगली मदन पाटील सुरेश पाटीलसुधीर गाडगीळपृथ्वीराज पवारअॅड. स्वाती शिंदेशिवाजी डोंगरे मिरजसिद्धार्थ जाधवबाळासाहेब होनमोरेसुरेश खाडेतानाजी सातपुतेनितीन सोनवणेआनंद डावरे तासगाव-सुरेश शेंडगेआर. आर. पाटीलअजितराव घोरपडेमहेश खराडेसुधाकर खाडेशंकर माने क.महाकांल वाळवाजितेंद्र पाटीलजयंत पाटील-------भीमराव मानेउदय पाटीलनाना महाडिक पलूस-पतंगराव कदमसुरेखा लाडपृथ्वीराज देशमुखलालासाहेब गोंदिलअंकुश पाटीलसंदीप राजोबा कडेगाव शिराळासत्यजित देशमुखमानसिंगराव नाईकशिवाजीराव नाईकनंदकिशोर निळकंठ------- जतविक्रम सावंतप्रकाश शेंडगेविलासराव जगतापसंगमेश तेलीभाऊसाहेब कोळेकरमहेश शिंदे खानापूर- आटपाडीसदाशिवराव पाटीलअमरसिंह देशमुखगोपीचंद पडळकरअनिल बाबरभक्तराज ठिगळेसतीश लोखंडे
एका रात्रीत बदलल्या इच्छुकांच्या निष्ठा
By admin | Published: September 28, 2014 12:41 AM