लम्पी लसीकरण: खासगी डॉक्टरांचे व सेवादात्यांचे मानधन वाढवले
By संतोष भिसे | Published: September 27, 2022 07:05 PM2022-09-27T19:05:12+5:302022-09-27T19:05:56+5:30
रक्कम वाढविण्याची खासगी डॉक्टरांनी केली होती मागणी
सांगली : लम्पी लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या खासगी डॉक्टरांचे व सेवादात्यांचे मानधन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार प्रत्येक लसीकरणासाठी आता पाच रुपये दिले जातील. आतापर्यंत तीन रुपये दिले जायचे. ही रक्कम वाढविण्याची मागणी खासगी डॉक्टरांनी केली होती. त्याबाबत मंगळवारी (दि. २७) झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली.
लसीकरणाचा खर्च संबंधित जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या निधीतून करायचा आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व इंटर्नच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. लसीकरणासाठी शेतांत जावे लागत असल्याने प्रवासासाठीच अधिक पैसे खर्च होतात, त्यामुळे प्रत्येक लसीकरणासाठी तीन रुपये परवडत नसल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे होते. महसुल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मानधनाविषयी विचार करण्याचे आश्वासन सोमवारी सांगलीत दिले होते. त्यानुसार तात्काळ निर्णय झाला.