Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:20 PM2024-11-23T14:20:22+5:302024-11-23T14:29:48+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांनी मोठी लढत दिली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात अजित पवार यांनी मोठी मोर्चेबांधणी करत निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली.
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही नेते हजार मतांनी आघाडी पिछाडीवर होते. सुरुवातील जयंत पाटील यांनी आघाडी घेतली होती, यानंतर निशिकांत पाटील यांनी आघाडी घेतली. या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली होती. अखेर शेवटच्याक्षणी जयंत पाटील यांनी मोठी आघाडी घेत १३,५०० मतांनी विजय मिळवला आहे.
इस्लामपूर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. भाजपातील निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन दोन मोठ्या प्रचारसभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारसभांसाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता. मतदारसंघात पाटील यांचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता, जयंत पाटील यांच्यावर ऊसाच्या मुद्द्यावरुन टीका केल्या होत्या. या मदरासंघात ऊस दराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता.