Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. सांगली जिल्ह्यात महायुतीने जोरदार विजय मिळवला. सांगली जिल्ह्यातील पाच मतदारसंघात महायुतीने विजय मिळवला. तर दुसरीकडे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा मोठा विजय झाला आहे. पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार संजयकाका पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने रोहित पाटील यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू होती. संजयकाका पाटील यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. तर अजित पवार यांनीही तासगाव मतदारसंघात जाहीर सभा घेऊन टीका केली होती.
माजी खासदार संजयकाका पाटील यांना कवठेमहांकाळ येथील अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला होता. यामुळे संजयकाका पाटील यांचे पारडे जड असल्याचे दिसत होते. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात संजयकाका पाटलांना मोर्चेबांधणी केली होती. यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू होती. पण अखेर नवखे असणारे रोहित पाटील यांनीच गड राखला आहे.
तासगाव मतदारसंघात रोहित पाटील यांना १२८४०३ एवढी मत मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजयकाका पाटील यांना १००७५९ एवढी मत मिळाली आहेत. रोहित पाटील यांनी २७,६४४ एवढ्या मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे.
सांगली जिल्ह्यातील निकाल
इस्लामपूर- जयंत पाटील ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
मिरज- सुरेश खाडे ( भाजपा)
शिराळा- सत्यजीत देशमुख ( भाजपा)
विटा- सुहास बाबर ( शिवसेना)
पलूस- विश्वजीत कदम (काँग्रेस)
जत - गोपीचंद पडळकर ( भाजपा)
तासगाव- रोहित पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
सांगली - सुधीर गाडगीळ ( भाजपा)