माहेश्वरी महिला संघटनेचा लवकरच उद्योग मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:42 AM2021-02-23T04:42:31+5:302021-02-23T04:42:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माहेश्वरी महिला संघटना ही कृतिशील मार्गाने जाणारी महत्त्वाची संघटना असून, लवकरच राष्ट्रीय पातळीवर उद्योग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माहेश्वरी महिला संघटना ही कृतिशील मार्गाने जाणारी महत्त्वाची संघटना असून, लवकरच राष्ट्रीय पातळीवर उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती संघटनेच्या राष्ट्रीय महामंत्री मंजू बांगड यांनी बैठकीत दिली.
संघटनेच्या सोलापूर व सांगली पदाधिकाऱ्यांची व्हर्च्युअल बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला माजी राष्ट्रीय अध्यक्ष लता लाहोटी, कल्पना गगडानी, राष्ट्रीय संघटनमंत्री शैला कलंत्री, कलावती जाजू, पुष्पा तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती. महिलांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी यापुढे नव्या योजना आखण्यात येतील, असे शैलजा कलंत्री यांनी सांगितले. पुष्पा तोष्णीवाल यांनी संपर्क ॲपची माहिती दिली. युवा पिढी ही समाजासाठी महत्त्वाची असल्याचे मत शांती मुंदडा यांनी मांडले. सूत्रसंचालन सृष्टी मालू यांनी केले. सोलापूर येथील सौ. अर्चना धूत यांनी महेशवंदनेवेळी कथ्थक नृत्य, तर सांगलीच्या रश्मी सारडा, रुपाली सारडा, सोनाली तोष्णीवाल यांनी स्वागत गीत सादर केले. स्नेहा बंग, रचना बजाज, शिखा मालू, अनुराधा दायमा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटिका सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. बार्शीच्या राजकमल हेडा, मंजू झंवर, शैला लोहिया यांनी भारुड सादर केले. प्रतिभा कलंत्री यांनी आभार मानले.