सिंचन योजना सौर उर्जेवर चालवण्याबाबत प्रस्ताव तयार करा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 PM2021-04-19T16:08:09+5:302021-04-19T16:17:20+5:30

Jayanti Patil Sangli : टेंभू, ताकारी, व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणी वाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम व प्रभावी करावी. या योजना सौर उर्जेवर चालवण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

Make a proposal to run irrigation scheme on solar energy: Jayant Patil | सिंचन योजना सौर उर्जेवर चालवण्याबाबत प्रस्ताव तयार करा : जयंत पाटील

सिंचन योजना सौर उर्जेवर चालवण्याबाबत प्रस्ताव तयार करा : जयंत पाटील

Next
ठळक मुद्देसिंचन योजना सौर उर्जेवर चालवण्याबाबत प्रस्ताव तयार करा : जयंत पाटीलपाणी वाटप व पाणीपट्टी वसुलीची व्यवस्था कार्यक्षम व प्रभावी करा

सांगली : टेंभू, ताकारी, व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणी वाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम व प्रभावी करावी. या योजना सौर उर्जेवर चालवण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

सांगली पाटबंधारे विभाग येथील विश्रामगृहात पालकमंत्री जयंत पाटील यांनी टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनांबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एम. जे. नाईक, उपअधीक्षक अभियंता अमर सुर्यवंशी, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तसेच कार्यकारी अभियंता सर्वश्री अभिनंदन हारूगडे, सचिन पवार, सुर्यकांत नलवडे, कुमार पाटील, राजन डवरी आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सिंचन योजनांच्या पाणीवाटपाबाबत व पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करावे. टंचाईच्या काळात पाणी देण्यासाठी त्याचा साठा करण्याबाबत योग्य नियोजन करावे अशा सूचना देवून त्यांनी सांगली, वाळवा, कासेगाव, समडोळी येथील पूरसंरक्षक कामे, डिग्रज बोरगाव कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरूस्ती कामे, आरफळ व कृष्णा कालवा लायनिंग कामे, मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला.

सिंचन योजनांची विद्युत देयक स्थिती, पाणीपट्टी वसुली, विविध बंदिस्त नलिका कामे, प्रगतीपथावरील व प्रस्तावित कामे, योजनांची सद्यस्थिती, भूसंपादन आदिंबाबत सविस्तर आढावा घेवून संबंधिताना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. तसेच क्षारपड जमिनीसंदर्भात कवठेपिरान, डिग्रज, बोरगांव, आष्टा, उरुण- इस्लामपूर या गावांचे सर्व्हे पूर्ण झाले असून प्रति हेक्टरी खर्च मापदंड शासनास त्वरीत सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Make a proposal to run irrigation scheme on solar energy: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.