कोतेंवबोबलाद येथील जळीतग्रस्त कुटुंबाला मानव मित्र संघटनेची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:49+5:302021-04-09T04:27:49+5:30
संख : कोतेंवबोबलाद (ता.जत) येथील दत्ता हरीसक परिट यांच्या राहत्या छप्पर वजा पत्रा घर, शेजारील हॉटेलला आग लागून ...
संख : कोतेंवबोबलाद (ता.जत) येथील दत्ता हरीसक परिट यांच्या राहत्या छप्पर वजा पत्रा घर, शेजारील हॉटेलला आग लागून दोन लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले. जळीतग्रस्त कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत मानव मित्र संघटनेने केली.
कोतेंवबोबलाद गावापासून पूर्वेला अर्धा किलोमीटर अंंतरावर अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर लगत दत्ता परिट कुटुंंबासह पत्राशेडमध्ये राहतात. त्यांचे राहत्या घरामध्येच हॉटेल व्यवसायही करतात.
हॉटेलसाठी चार दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे जादा माल भरला होता. शनिवारी हॉटेल बंद करून गेले होते. रविवारी पहाटे ४ वाजता अचानक हॉटेल, पाठीमागील खोलीला आग लागली.
आगीत रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य, गॅस, फ्रीज, कपाट, भांडी, धान्य, हॉटेलचे साहित्य जळून खाक झाले. तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसंत बागडे बाबा संघटनेने सामाजिक बांधीलकी जपत मदत केली.
यावेळी सरपंच पुंडलिक कांबळे, रमेश माळी, मानव मित्र संघटनेचे सोहन धुमाळ, ऋषी दोरकर, शंकर सावंत उपस्थित होते.