सिलिंडरवर मारुनी फुली, अनेक घरात पेटल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:58+5:302021-03-25T04:24:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गॅसच्या अनुदानाचे बंद झालेले दरवाजे, दराचा उडालेला भडका यामुळे गॅस सिलिंडरपासून सामान्य लोक आता ...

Maruni flowers on cylinders, stoves burning in many houses | सिलिंडरवर मारुनी फुली, अनेक घरात पेटल्या चुली

सिलिंडरवर मारुनी फुली, अनेक घरात पेटल्या चुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गॅसच्या अनुदानाचे बंद झालेले दरवाजे, दराचा उडालेला भडका यामुळे गॅस सिलिंडरपासून सामान्य लोक आता दूर पळू लागले आहेत. सांगली शहरातील झोपडपट्ट्यांसह मोठ्या कॉलनींमध्येही अनेक घरात सिलिंडरला फुली मारुन आता चुली पेटू लागल्या आहेत.

सांगली जिल्ह्याचा विचार केल्यास २०११च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात इंधन म्हणून लाकडाचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या ४४ टक्के होती. त्यावेळी गॅसच्या वापरकर्त्यांची संख्या ३८.८ टक्के म्हणजेच २ लाख २७ हजार इतकी होती. २०२० पर्यंत ही संख्या ७ लाख ३८ हजार इतकी झाली. म्हणजेच जवळपास ही संख्या ९० टक्क्यांवर गेली. आता याचा उलटा प्रवास सुरु होत आहे. गोरगरीब लोकांना महागडा गॅस परवडत नसल्याने त्यांनी चुलीला पुन्हा जवळ केले आहे. रोजंदारीवर जाणारे, कामगारवर्ग, शेतमजूर व अन्य गरीब लोक आता चुलीवर स्वयंपाक करणे पसंत करीत आहेत.

कोट

गॅस व सर्वच प्रकारची महागाई वाढली आहे. त्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. साडेआठशे रुपये सिलिंडरला देण्यापेक्षा काट्याकुट्या गोळा करुन त्यावर स्वयंपाक करणे परवडते.

- सुनीता साबळे, संजयनगर, सांगली

कोट

आमच्यासारख्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी गॅस सिलिंडर नाही. शासनाच्या योजना फक्त कनेक्शन देण्यापुरत्या आहेत. त्यानंतर महागडे सिलिंडर घेणार कोण? त्यामुळे आम्ही पुन्हा चुलीवरच सर्व स्वयंपाक करीत आहोत.

- मनेगी बिरुनगी, शिवोदयनगर, सांगली

गॅस कनेक्शनची संख्या

एचपीसीएल ३,५१०००

बीपीसीएल २,७५,०००

आयओसीएल १,१२,०००

चौकट

बंबचीही वापसी

सिलिंडर महागल्याने पाणी तापविण्याचे बंब परतले आहेत. अनेक घरांमध्ये गॅसवर पाणी तापविणे बंद करुन बंबात पाणी तापविणे सुरु केले आहेत. सिमेंटच्या चांगल्या घरांमध्येही हे बंद आता दिसत आहेत.

Web Title: Maruni flowers on cylinders, stoves burning in many houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.