विद्यापीठ उपकेंद्रासाठी सांगलीत आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:02+5:302021-03-27T04:28:02+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (दि. २७) विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची ...
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (दि. २७) विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सांगलीत आयोजित केल्याची माहिती उपकेंद्र समितीचे निमंत्रक ॲड. अमित शिंदे यांनी दिली.
ॲड. शिंदे म्हणाले, विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतच होण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीच्या माध्यमातून व्यापक लढा सुरू आहे. त्यासाठी महाविद्यालये, ग्रामपंचायती, विविध संस्था व संघटनांचे ठराव घेतले जाणार आहेत. भविष्यात आंदोलन व्यापक केले जाणार आहे. त्याविषयी विचारविनिमय शनिवारच्या बैठकीत केला जाईल.
उपकेंद्र जिल्ह्याच्या ठिकाणापासून २५ किलोमीटरच्या परिसरात होणे आवश्यक आहे. ते होण्यासाठी तत्काळ निर्णयाचीही गरज आहे. त्याविषयी चर्चा बैठकीत होईल. कॉलेज कॉर्नरला राजाराम कॉम्प्लेक्स येथे दुपारी चार वाजता ही बैठक होईल. यावेळी अभिषेक खोत, रोहित शिंदे, तेजस नांद्रेकर, तुळशीराम गळवे, अतुल फसाले, योगेश नाडकर्णी, हर्षवर्धन आलासे, जगदीश लिमये आदी उपस्थित होते.