मुंबईतील क्रांतिसिंहांचे स्मारक राज्यात अव्वल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:22+5:302021-02-15T04:24:22+5:30
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे रविवारी खानापूर व कडेगाव मराठी साहित्य परिषद आणि क्रांतिवीर भगवानराव पाटील जन्मशताब्दी समितीच्या वतीने देण्यात ...
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे रविवारी खानापूर व कडेगाव मराठी साहित्य परिषद आणि क्रांतिवीर भगवानराव पाटील जन्मशताब्दी समितीच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) सामाजिक पुरस्कार उस्मानाबाद येथील पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आ. मोहनराव कदम, आ. अनिल बाबर, क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील, नाशिकचे स्वातंत्र्यसेनानी सांगळे बाबा, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, संपतराव पवार उपस्थित होते.
धनंजय पाटील म्हणाले, दिल्लीला लाखो शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत. त्यातील शेकडो मृत्युमुखी पडले आहेत. परंतु, सरकार त्यांची दखल घेत नाही. हे विदारक चित्र यापुढील काळात बदलले पाहिजे.
आ. अनिल बाबर यांनी भगवानराव पाटील यांचे स्वातंत्र्यलढ्यातील व त्यानंतरचेही सामाजिक आणि राजकीय योगदान सांगून क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचा गौरव केला. राष्ट्रपती शौर्य पदक मिळाल्याबद्दल मुंबई पोलीस सेवेतील जीवन जाधव यांचाही सत्कार झाला.
अॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुंबई येथील क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडईचे अध्यक्ष शंकरराव पाटील, अॅड. अविनाश देशमुख, प्रा. विलासराव पाटील, सुभाष पवार, प्रकाश यादव, चंद्रकांत देशमुखे, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सदानंद माळी, उत्कर्ष पाटील, किमया पाटील, आदी उपस्थित होते. सागर पाटील यांनी आभार मानले.
फोटो - १४०२२०२१-विटा-क्रांतिसिंह पुरस्कार : हणमंतवडिये येथे भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते भाई धनंजय पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डावीकडून अॅड. सुभाष पाटील, सौ. पाटील, भाई संपतराव पवार, आ. अनिल बाबर, आ. मोहनराव कदम उपस्थित होते.