जतमधील उमदी- माडग्याळ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के?
By हणमंत पाटील | Published: March 5, 2024 03:26 PM2024-03-05T15:26:52+5:302024-03-05T15:27:02+5:30
मंगळवारी वातावरणात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे विज्ञानाच्या अभ्यासकांचे मत आहे.
राहुल संकपाळ
उमदी : जत तालुक्यातील उमदी व उटगी, माडग्याळ परिसरात मंगळवारी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी काही भागात भूकंप सदृष्य सौम्य धक्का जाणवला. सौम्य धक्याबरोबरच मोठा आवाज झाला. दुपारची वेळ असल्याने व शांतता असल्याने झालेला आवाज प्रकर्षाने जाणवला.
भूगर्भातून आवाज येताच लोक घरातून बाहेर पळाले. एकच पळापळ उडाली. पुर्व भागातील अनेक गावात हा मोठा आवाज आल्याने काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. भूकंपाचा धक्का जाणवताच भूकंपाचा सौम्य धक्का असल्याने घाबरण्याचे कारण नाही, त्यामुळे लोकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन याबाबत प्रशासनाने केले आहे.
मंगळवारी वातावरणात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे विज्ञानाच्या अभ्यासकांचे मत आहे.