लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शिराळा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिलाजिवे मारण्याची धमकी देणाºया उदय यशवंत निकम (वय ४0, रा. शिराळा) यालायेथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसºया जिल्हा न्यायाधीश सौ.के. एस. होरे यांनी ४ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाचीशिक्षा सुनावली.
न्यायालयाने निकम याला विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधककायद्याखाली ४ वर्षे सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६महिने साधी कैद, तसेच कलम ४५२ व ५0६ नुसार २ वर्षे सश्रम कारावास, २ हजाररुपये दंड व दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा दिली.
या सर्वशिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. फिर्यादीतर्फे अतिरिक्त जिल्हासरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, ४ नोव्हेंबर २0१५ रोजी सायंकाळी ५.३0 च्यासुमारास निकम मळा परिसरात विनयभंगाची ही घटना घडली होती. यातील पीडितअल्पवयीन मुलगी दुपारच्यावेळी घरी झोपली होती. त्यावेळी आरोपीने तिलालज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन, आरडाओरडा केल्यास जिवे मारण्याचीधमकी देऊन पलायन केले होते.
याबाबत शिराळा पोलिसांत गुन्हा नोंद होता.सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी मुलगी, तिचे आई,वडील, मुख्याध्यापिका व पोलिस उपनिरीक्षक डी. एन. वाईकर यांच्या साक्षीन्यायालयाने ग्राह्य धरल्या.सरकारी वकील सौ. पाटील यांनी आपल्या युक्तिवादात या गुन्ह्याचे गांभीर्यआणि आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, आरोपीने दुष्कृत्य केले आहे. याघटनेनंतर पीडित मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळेन्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयानेहा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस शिक्षा सुनावली. सहाय्यक पोलिस फौजदारटी. ए. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी खटल्याकामी सहकार्य केले.