ओबीसीचा निधी वर्ग न केल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:32+5:302020-12-30T04:37:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ओबीसी प्रवर्गातील घटकांच्या विकासासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली ५०० कोटींचा निधी तातडीने वर्ग करावा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ओबीसी प्रवर्गातील घटकांच्या विकासासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली ५०० कोटींचा निधी तातडीने वर्ग करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने देण्यात आला. याबाबत समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, राहुल माने, सरचिटणीस रोहित घुबडे-पाटील, वैशाली शेळके, शहानवाज सौदागर, मनोज यमगर, संजय कोटकर, अजय काकडे, आदिनाथ शेडबाळे, श्रीकांत वाघमोडे, प्रसाद वळकुंडे, स्वरूप रानभरे उपस्थित होते.
धनगर समाज व ओबीसी प्रवर्गातील ३४६ जाती व भटक्या विमुक्तांमधील ५३ जातींच्या विकासासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील ५०० कोटींचा निधी महाआघाडी सरकारने वर्ग केलेला नाही. या निधीतून सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज, मोफत वसतिगृह बांधण्याची योजना, परदेशी शिक्षणासाठी अर्थसहाय्य, मोफत घरकुल अशी कामे हाती घेतली जातात; पण निधी वर्ग न झाल्याने विद्यार्थी व समाजातील इतर लोकांचा विकासात अडचण निर्माण झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत हा निधी वर्ग न झाल्यास भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.