सांगली : महापालिकेच्या पॅनलवरील वकिलांकडून न्यायालयात हाताळण्यात येत असलेल्या खटल्यांच्या निकालाचे ऑडिट करून त्याचा अहवाल सार्वजनिक करा, अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
साखळकर म्हणाले की, महापालिकेने कायदेशीर प्रकिया पूर्ण करण्यासाठी वकील पॅनलची नियुक्ती केली आहे. प्रत्येक सत्ताधाऱ्याने आपल्याला अनुकूल पॅनल नेमले आहे. मात्र, काही खटल्यात जाणूनबुजून गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कायदेशीर पळवाटा काढून व्यक्ती, समुहाला फायदा होईल, असे वर्तन दिसत आहे. परिणामी महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा मालमत्तांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे वकील पॅनलवर आतापर्यंत किती रुपये खर्च करण्यता आले. वकिलांकडे कोणकोणते खटले आहेत. त्याचे निकाल काय लागले, याचे ऑडिट करण्यात यावे. त्याचा अहवाल सार्वजनिक करावा. प्रशासनाने ऑडिट न केल्यास नागरिक जागृती मंचाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.