नंदीवाले समाजातील कष्टकरी गरीब कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:57 AM2021-05-20T11:57:16+5:302021-05-20T12:07:11+5:30

Sangli News : कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील ४ कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं आहे.

Nandiwale social exclusion on the working poor family in the society | नंदीवाले समाजातील कष्टकरी गरीब कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

नंदीवाले समाजातील कष्टकरी गरीब कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

googlenewsNext
ठळक मुद्देकष्टकरी गरीब कुटुंबावर जात पंचायतीचा सामाजिक बहिष्कार४ कुटुंब कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील

सांगली : कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील ४ कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं आहे.

यल्लाप्पा चिनाप्पा चव्हाण (रा. काळे प्लॉट,कवठेमहांकाळ,जि सांगली)यांचेसह ४ कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं आहे. या कुटुंबासी कोणी संबंध ठेवल्यास ५००० रूपये दंड ठोठावला जाईल असा फतवा पंचानी मिटींग घेऊन काढला आहे.

पिडीतांच्या मुलां मुलींची लग्ने पंच मोडतात, मयत झालेवरही कोणी मदतीला येत नाही, रोजगारांला सुध्दा बोलवत नाहीत, समाजातील कोणत्याही कार्यक्रमास बोलवत नाहीत, पंच पिडीतांना दमदाटी करतात, अशा प्रकारचा बहिष्कार अनेक दिवस सुरू आहे.

पिडीतांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपूर्ण साधला आहे,तसेच कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.

Web Title: Nandiwale social exclusion on the working poor family in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.