सांगली : कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजातील ४ कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं आहे.
यल्लाप्पा चिनाप्पा चव्हाण (रा. काळे प्लॉट,कवठेमहांकाळ,जि सांगली)यांचेसह ४ कुटुंबाना नंदीवाले समाज जातपंचायतीने जागेच्या वादाचे निमित्त करून वाळीत टाकलं आहे. या कुटुंबासी कोणी संबंध ठेवल्यास ५००० रूपये दंड ठोठावला जाईल असा फतवा पंचानी मिटींग घेऊन काढला आहे.
पिडीतांच्या मुलां मुलींची लग्ने पंच मोडतात, मयत झालेवरही कोणी मदतीला येत नाही, रोजगारांला सुध्दा बोलवत नाहीत, समाजातील कोणत्याही कार्यक्रमास बोलवत नाहीत, पंच पिडीतांना दमदाटी करतात, अशा प्रकारचा बहिष्कार अनेक दिवस सुरू आहे.पिडीतांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपूर्ण साधला आहे,तसेच कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.