गळवेवाडी बालिका खुनातील संशयितांची ‘नार्को’ तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 08:30 PM2018-03-12T20:30:31+5:302018-03-12T20:30:31+5:30

सांगली : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतिक्षा दादासाहेब गळवे (वय ८ वर्षे) या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून झाल्याप्रकरणी संशयाच्या भोवºयात सापडलेल्या एका संशयित आरोपीची ‘नार्को’ तपासणी

'Narco' inspection of the accused in the murder of a girl child | गळवेवाडी बालिका खुनातील संशयितांची ‘नार्को’ तपासणी

गळवेवाडी बालिका खुनातील संशयितांची ‘नार्को’ तपासणी

Next
ठळक मुद्देन्यायालयाची परवानगी : पोलीस प्रमुखांची माहिती

सांगली : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतिक्षा दादासाहेब गळवे (वय ८ वर्षे) या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून झाल्याप्रकरणी संशयाच्या भोवºयात सापडलेल्या एका संशयित आरोपीची ‘नार्को’ तपासणी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी सोमवारी दिली. लवकरच या खुनाचा उलघडा करण्यास यश येईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

दुसरीत शिकणाºया प्रतीक्षाचे ७ जानेवारीला अपहरण झाले होते. ८ जानेवारीला गावातील पडक्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्याच पायजम्याने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. प्रतीक्षाचा मृतदेह ज्या पडक्या विहिरीत सापडला, तिथेच तिच्या पायातील एक निळ्या रंगाची (स्लिपर) चप्पल सापडली होती. याच चप्पलच्या वासावरून श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला. पण प्रतीक्षाची दुसरी चप्पल आणि जिथे तिचा खून झाला, त्या घटनास्थळाचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिकाºयांसह कर्मचाºयांनी परिसरातील ऊस, ज्वारी, मका या पिकांतून, चिखलातून सगळा परिसर पिंजून काढला. परिसरातील घरोघरी जाऊन पोलिसांनी प्रत्येकाचे जबाब घेतले. यातून तपासाला दिशा मिळाल्याने एका संशयितांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.

पोलिसांची दिशाभूल
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या संशयितास ताब्यात घेवून चौकशी केली. पण तो उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करीत आहे. यासाठी त्याची ‘नार्को’ तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. परवानगीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यास मंजूरी दिली आहे. लवकरच नार्को तपासणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले.

Web Title: 'Narco' inspection of the accused in the murder of a girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.