काेराेनामुक्तीसाठी नरवाडकरांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:08+5:302021-06-06T04:21:08+5:30
आपत्ती व्यवस्थापन समितीने गाव कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे. शासनाचे बक्षीस मिळविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी शनिवारी गावातील हनुमान मंदिरात आयाेजित ...
आपत्ती व्यवस्थापन समितीने गाव कोरोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे. शासनाचे बक्षीस मिळविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी शनिवारी गावातील हनुमान मंदिरात आयाेजित बैठकीत केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य विभाग, शिक्षक उपस्थित हाेते.
नोडल अधिकारी शीतल उपाध्ये यांनी शासन आदेशाची माहिती देत काेराेनामुक्तीच्या दिशेने वाटचाल कशी करावी?,
याकामी विविध समित्या कशा स्थापन कराव्यात? याबाबत मार्गदर्शन केले. तब्बल ३ तास बैठक चालली. लसीकरणाचे नियोजन, काळ्या बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? याबाबतही
नोडल अधिकारी उपाध्ये यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
गावाने २००२ मध्ये घेण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातून
तिसरा क्रमांक पटकाविला होता. आता गावाने कोरोना मुक्तीचा विडा उचलला आहे. तो कितपत बक्षीस मिळवून देतो, हे काळच ठरविणार आहे. पोलीसपाटील दीपक कांबळे यांनी आभार मानले.
बैठकीस नोडल अधिकारी शीतल उपाध्ये, सरपंच राणी नागरगोजे, ग्रामसेविका उज्ज्वला आवळे, उपसरपंच डॉ. रामगौडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य मारुती जमादार, अजित हेगडे, सुनील ममदापुरे, स्वाती आवटी, नीलाताई शेगावे, निर्मला कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, अंगणवाडी, आरोग्य आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.