राष्ट्रीय बालमहोत्सवात गोटखिंडी जि. प. शाळेचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:31 AM2021-07-14T04:31:56+5:302021-07-14T04:31:56+5:30
गोटखिंडी : भारत स्काऊटस् आणि गाईडस्, नवी दिल्ली यांच्यामार्फत देशातील कब आणि बुलबुलसाठी राष्ट्रीय ऑनलाइन बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात ...
गोटखिंडी : भारत स्काऊटस् आणि गाईडस्, नवी दिल्ली यांच्यामार्फत देशातील कब आणि बुलबुलसाठी राष्ट्रीय ऑनलाइन बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा नं. १ गोटखिंडी ता. वाळवा या शाळेतील दोन कब विद्यार्थी या राष्ट्रीय बालमहोत्सवात सहभागी झाले होते.
या शाळेतील इयत्ता चौथीमधील कब आर्यन चंद्रकांत पाटील आणि कब राजवर्धन नेताजी पाटील या दोन कब विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पेपर क्राफ्ट आणि फोक डान्स स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागाबद्दल ऑनलाइन प्रमाणपत्र मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेतील कबमास्टर प्रसाद राजाराम हसबनीस यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णात भोईटे, सांगली जिल्हा गाईड संघटक सविता भोळे, जिल्हा स्काऊट संघटक विक्रम देशपांडे, केंद्रप्रमुख सुनंदा पाटील यांनी राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी कब विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.