परीट व्यवसायात नवा बदल; गॅसवर चालणाऱ्या इस्त्रीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:48 PM2019-12-28T23:48:57+5:302019-12-28T23:52:16+5:30
आता विजेच्या इस्त्रीलाही गॅसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मिरजेत गेल्या चाळीस वर्षांपासून पुजारी चौकात परीट व्यवसाय करणाºया केशव रामचंद्र रसाळ व जयवंत रामचंद्र रसाळ बंधूनी त्यांच्या दुकानात गॅसवर चालणाºया इस्त्रीचा वापर सुरू केला आहे.
मिरज : कोळशाच्या दरवाढीमुळे विजेच्या इस्त्रीचा वापर करणारे परीट बांधव, वीज दरवाढीमुळे आता गॅसवर चालणा-या इस्त्रीचा वापर करीत आहेत. मिरजेत गॅसवर चालणा-या इस्त्रीचा वापर सुरू झाला आहे.
कपडे इस्त्रीसाठी पारंपरिक कोळशाच्या इस्त्रीचा वापर गेल्या काही वर्षापासून बंद झाला आहे. कोळशाची दरवाढ व प्रदूषणामुळे सर्वत्र विजेच्या इस्त्रीचा वापर सुरू आहे. मात्र विजेचीही दरवाढ व भारनियमनामुळे विजेच्या इस्त्रीच्या वापरालाही मर्यादा आहेत. कपडे इस्त्रीच्या दरवाढीमुळे ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने व्यवसाय अडचणीत आहे. पारंपरिक कोळशाची इस्त्री जवळपास बंदच झाली असून, आता विजेच्या इस्त्रीलाही गॅसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मिरजेत गेल्या चाळीस वर्षांपासून पुजारी चौकात परीट व्यवसाय करणाºया केशव रामचंद्र रसाळ व जयवंत रामचंद्र रसाळ बंधूनी त्यांच्या दुकानात गॅसवर चालणाºया इस्त्रीचा वापर सुरू केला आहे.
इस्त्री व्यवसायासाठी व्यावसायिक दराने वीजपुरवठा होत असून इस्त्रीसाठी विजेचा वापर जास्त होतो. वीज दरवाढीमुळे व्यवसायात नफा कमी झाला असल्याने, गॅसवर चालणाºया इस्त्रीचा वापर रसाळ बंधंूनी सुरू केला आहे. सुमारे सहा हजार रुपये किमतीची गॅसवर चालणारी इस्त्री एक किलो गॅसमध्ये पंधरा तास चालते. स्वयंपाकाच्या शेगडीप्रमाणेच लायटरने ही इस्त्री पेटवावी लागते. व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर या इस्त्रीसाठी वापरता येतो. विजेपेक्षा गॅसवरील इस्त्री सध्या परवडणारी असल्याने, प्रायोगिक तत्त्वावर या इस्त्रीचा वापर सुरू केल्याचे रसाळ बंधूंनी सांगितले. मात्र गॅसची दरवाढ झाल्यास पुन्हा विजेच्या इस्त्रीचाच वापर करावा लागणार आहे.
- व्यवसायासाठी धडपड
घरोघरी विजेच्या इस्त्रीचा वापर सुरू असल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यातच वीजबिलामुळे व्यवसायात होणारा नफा तुटपुंजा असल्याने, इस्त्रीसाठी गॅसचा वापर सुरू झाला आहे. कोळशावरील इस्त्री जाऊन विजेची इस्त्री आली. आता वीज दरवाढीने गॅसची इस्त्री आली असून, नवीन बदलास व तंत्रज्ञानास सामोरे जाऊन व्यवसाय टिकविण्यासाठी परीट बांधवांची धडपड सुरू आहे.