भारतीयांमध्ये चिनी वस्तूंविरोधात लाट, चिनी वस्तू नको, मेड इन इंडियाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:41 PM2020-06-18T18:41:48+5:302020-06-18T18:51:31+5:30

चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले. भारताच्या सीमेवरही चीन कुरापती काढत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंविरोधात लाट निर्माण झाली. सांगलीच्या बाजारपेठेत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा करत आहेत.

No Chinese, just Made in India! | भारतीयांमध्ये चिनी वस्तूंविरोधात लाट, चिनी वस्तू नको, मेड इन इंडियाच पाहिजे!

भारतीयांमध्ये चिनी वस्तूंविरोधात लाट, चिनी वस्तू नको, मेड इन इंडियाच पाहिजे!

googlenewsNext
ठळक मुद्दे चिनी वस्तू नको, मेड इन इंडियाच पाहिजे!भारतीयांमध्ये चिनी वस्तूंविरोधात लाट

संतोष भिसे 

सांगली : चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले. भारताच्या सीमेवरही चीन कुरापती काढत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंविरोधात लाट निर्माण झाली. सांगलीच्या बाजारपेठेत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा करत आहेत.

एरवी शोरुममध्ये ग्राहक व विक्रेता या दोहोंकडून चिनी वस्तूंना प्राधान्य मिळायचे. आता विक्रेतेच भारतीय वस्तूंची शिफारस करत आहेत. ग्राहकदेखील भारतीय बनावटीच्या उपकरणांची चौकशी करताहेत. यामुळे शोरुममध्ये भारतीय वस्तूंना प्राधान्याची जागा मिळू लागली आहे. काही संघटनांनी चिनी वस्तूंविरोधात जनजागरही सुरु केला आहे.

प्रधानमंत्र्यांच्या आत्मनिर्भरतेच्या आवाहनाचे प्रतिबिंब बाजारपेठेत उमटू लागले आहे. सांगलीच्या बाजारपेठेत मोबाईल, संगणक, किचनवेअर, घरगुती उपकरणे, विद्युत उपकरणे, दिवे, फ्रीज, लॅपटॉप अशा बहुसंख्य वस्तूंमध्ये चायनीज वस्तूंचेच वर्चस्व आहे. ते कमी करण्यासाठी ग्राहक व व्यावसायिक पुढे सरसावले आहेत.

बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून भारतीय बनावटीची उपकरणे ग्राहकांना दाखविली जात आहेत. विशेषत: घरगुती उपकरणांमध्ये भारतीय बनावटीचा शोध ग्राहक घेत आहेत.
 

Web Title: No Chinese, just Made in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.