चाचण्यांचे वाढविलेले प्रमाण सोमवारीही कायम ठेवताना आरटीपीसीआर अंतर्गत ३४७६ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ४४३ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७६०९ जणांच्या तपासणीतून ६५९ जणांना कोरोनाचे निदान झाले.
जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ३, मिरज १, तासगाव ४, जत, वाळवा ३, शिराळा, मिरज तालुक्यांत प्रत्येकी २, आटपाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत सोमवारी पुन्हा वाढ होताना ९०४० जण उपचार घेत असून, त्यातील ११५४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९३४ जण ऑक्सिजनवर, २२० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू तर २९ जण बाधित आढळले.
चौकट
म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत सोमवारी पुन्हा वाढ होत चार नवे रुग्ण आढळून आले. बाधितांची संख्या २४४ वर पोहोचली असून, आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १३१२७४
उपचार घेत असलेले ९०४०
कोरोनामुक्त झालेले ११८४७७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३७५७
पॉझिटिव्हिटी रेट ९.९४
सोमवारी दिवसभरात
सांगली ५९
मिरज २९
आटपाडी २२
कडेगाव १०४
खानापूर ८३
पलूस ७९
तासगाव ८५
जत ५५
कवठेमहांकाळ २६
मिरज तालुका १४६
शिराळा ९४
वाळवा २९१