रोपवाटिका तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:53+5:302021-04-13T04:25:53+5:30

अवैध वृक्ष तोडीवर करवाईची मागणी शिराळा : तालुक्यातील काही भागांमध्ये अवैधपणे वृक्षतोड होत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत ...

Nursery loss | रोपवाटिका तोट्यात

रोपवाटिका तोट्यात

Next

अवैध वृक्ष तोडीवर करवाईची मागणी

शिराळा : तालुक्यातील काही भागांमध्ये अवैधपणे वृक्षतोड होत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

---------------

स्वच्छतागृहांची मागणी

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपूर हा महामार्ग जातो. या मार्गावर स्वच्छतागृहांची सध्या गरज आहे. स्वच्छतागृहांची उपलब्धता नसल्याने अनेक वेळा प्रवाशांची गैरसोय होत आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे.

-------------

बचत गटांपुढे विविध समस्या

सांगली : जिल्ह्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे; पण सध्या लॉकडाऊनमुळे बचत गटांपुढे विविध समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक तात्काळ करणे गरजेचे आहे.

Web Title: Nursery loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.