नववर्षात स्थायी समितीची ऑफलाईन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:19 AM2021-01-01T04:19:10+5:302021-01-01T04:19:10+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची महासभा, स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सभा ऑनलाईन घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार महासभेचे कामकाज ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची महासभा, स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सभा ऑनलाईन घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार महासभेचे कामकाज ऑनलाईन होत आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेसने सभा ऑफलाईन घ्याव्यात, अशी मागणी केली होती. पण शासनाने महासभावगळता समित्याच्या सभा ऑफलाईन घेण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता नऊ महिन्यांनंतर ‘स्थायी’ची सभा सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात होत आहे.
या सभेत आमराई उद्यानात मिनी ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे तसेच नेमिनाथनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या जागेत चिल्ड्रन पार्क विकसित करण्यावरही चर्चा होणार आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीतून ९१ लाखांचा खर्च केला जाणार आहे. पण समितीच्या महिला सदस्यांच्या मंजुरीविनाच हा विषय स्थायीसमोर आल्याने वाद निर्माण झाला आहे. याविरोधात नगरसेविकांनी नगरविकास मंत्र्यांच्याकडे तक्रार केली आहे. विद्युत साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने वारंवार मागणी करूनही साहित्याचा पुरवठा न केल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्याचा विषय स्थायी समितीसमोर आहे.