स्वातंत्रदिनानिमित्त मिरजेत पारंपारिक वेशभूषेत एक तास स्केटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:33 AM2022-08-17T11:33:10+5:302022-08-17T11:33:37+5:30
छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, महात्मा बसवेश्वर, लष्कर, नाैदल, वायुदलाच्या वेशभूषा परिधान करून खेळाडूंनी स्केटिंग केले.
मिरज : स्वातंत्रदिनानिमित्त मिरजेत रायझिंग स्पोर्ट्स क्लबच्या ३५ बाल खेळाडूंनी पारंपरिक वेशभूषेत सलग एक तास स्केटिंग केले. वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया व ग्लोबल जिनीयस रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. रायझिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक मनोज यादव, उपाध्यक्ष प्रसाद शानभाग धनजय वणुसे, अभिजित शिंदे यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले.
मिरजेतील ऑक्सिजन पार्क येथे रायझिंग स्पोर्ट्स क्लबच्या ३५ खेळाडूंनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध राज्यांच्या वेशभूषेचे दर्शन घडवले. छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, महात्मा बसवेश्वर, लष्कर, नाैदल, वायुदलाच्या वेशभूषा परिधान करून खेळाडूंनी स्केटिंग केले. बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन, रायझिंग स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष ओमकार शुक्ल यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले. पल्लवी तोडकर यांनी सूत्रसंचालन केले.