लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रात प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी, मिरज शहरात मात्र चौका-चौकात कचºयाचे ढीग जैसे थेच आहेत. तीन ते चार दिवस कचरा रस्त्यावर पडून असतो. येत्या आठ दिवसात कचरा उठाव सुरळीत न झाल्यास मिरजेतील सहाय्यक आरोग्याधिकाºयांना कचºयानेच अंघोळ घालू, असा इशारा माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सोमवारी दिला.बागवान म्हणाले की, मिरजेत कचरा उठावाची यंत्रणा कोलमडली आहे. चौका-चौकात कचरा तसाच पडून असतो. तीन ते चार दिवस कचरा उठाव होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. ताटे यांना वारंवार सूचना देऊनही कचरा उचलला जात नाही. एकीकडे आयुक्त रवींद्र खेबूडकर महापालिका हद्दीत स्वच्छता अभियान राबवित आहेत, तर दुसरीकडे मिरजेत कचरा उठाव, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. प्रभागात किती कर्मचारी आहेत, मुकादम कोण आहे, याचीही माहिती नसते. कचरा उठावाबाबत महापालिकेचे प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली नाही. घंटागाडीवर कचरा जमा करण्यासाठी डबे नाहीत. कंटेनरची मोडतोड झाली आहे. मिरजेतील सहाय्यक आरोग्याधिकारी मात्र परवाने, दाखले देण्यातच मग्न आहेत. कचरा उठाव, नागरिकांच्या आरोग्यापेक्षा परवाने देण्यातच त्यांना अधिक रस आहे. येत्या आठ दिवसात कचरा उठाव न झाल्यास सहाय्यक आरोग्याधिकाºयांना कचºयाने अंघोळ घालू, असा इशाराही त्यांनी दिला.
अन्यथा आरोग्य अधिकाºयांना कचºयानेच अंघोळ घालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:21 AM