शिगाव येथे पाेलीस चाैकी कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:38+5:302021-04-24T04:26:38+5:30
आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार शिगाव येथे आष्टा पोलीस ठाण्याच्या वतीने चेकपोस्ट सुरू केले आहे. ...
आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार शिगाव येथे आष्टा पोलीस ठाण्याच्या वतीने चेकपोस्ट सुरू केले आहे. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील नागरिकांना आवाहन आहे की, विनाकारण कोणीही प्रवास करू नये. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाईल; तसेच दंड आकारला जाईल. त्यामुळे सर्वांनी घरीच रहा, सुरक्षित रहा.
सरपंच उत्तम गावडे म्हणाले, जिल्हाबंदीच्या निर्णयाला ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करील. लागेल ती मदत चेकपोस्टवर पुरविली जाईल; तसेच लवकरच मुख्य रस्ता सोडून जिल्ह्यात प्रवेश करता येणारे इतर सर्व रस्तेही ग्रामपंचायतीकडून बंद करू.
यावेळी उपनिरीक्षक डी. व्ही. सदामते, सहायक उपनिरीक्षक सनदी, पोलीस कॉन्स्टेबल ए. जे. नायकवडी, पी. सी. ऐवळे, पोलीस पाटील नरेंद्र मधाळे, उदयसिंह पाटील, अजित बारवडे, होमगार्ड ऋषिकेश सन्मुख, सूरज शिद, डॉ. अरुण कदम, समीर नदाफ, फिरोज नदाफ, सुनील चौगुले, पिट्या ठाकूर, आदी उपस्थित होते.
फोटो : २३ शिगाव १
ओळ : शिगाव (ता. वाळवा) येथे आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद, उपनिरीक्षक डी. व्ही. सदामते यांनी वारणा पुलानजीक तपासणी नाका सुरू केला.