ओळ : आमनापूर येथे पशुधन सुरक्षित स्थळी घेऊन जाताना नागरिक.
फाेटाे : २३ पलुस २
ओळ : ट्रॅक्टरमधून नागरिक स्थलांतर करत आहेत.
अशुतोष कस्तुरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
पलूस : पलूस तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आता कृष्णा नदीने रौद्र रूप धारण केले आहे, तालुक्यातील निम्म्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊस आणि कोयना धरणातून येणारे पाणी, यामुळे तालुक्यातील कृष्णा काठच्या लोकांमध्ये पुन्हा धडकी भरली आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यात सरासरी ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २०१९च्या पुराच्या आठवणी अजून ताज्या असताना, या वर्षी एका रात्रीत नदीला आलेल्या पाण्याने नागरिकांची झोप उडविली. तालुक्यातील तुपारी, घोगाव, दह्यारी, दुधोंडी, आमनापूर, बुर्ली, वसगडे, भिलवडी, ब्रह्मनाळ, खटाव, सुखवाडी, चोपडेवाडी, हजारवाडी, खंडोबाचीवाडी, नवी पुनदी, पुनदी या गावांना पुराचा फटका बसला आहे. पुराचे पाणी रात्रीचे नागरी वस्तीत घुसल्याने एकच दैना उडाली. जीव धोक्यात घालून पशुधन वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरू हाेती. पुरामुळे वीज नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही, हातातोंडाला आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत, तसेच वाढणाऱ्या गारठ्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
पूरपरिस्थितीत नदीकाठच्या नागरिकांनी पै-पाहुण्यांचा आसरा असायचा, पण यावेळी कोरोनामुळे नातेवाइकांकडे जाणेही सुरक्षित नाही. एकंदरीत तालुक्यातील नागरिकांना आता कोरोनाबरोबर पूरपरिस्थिती अशा दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
230721\20210723_121850.jpg
विशेष वृत्त फोटो