अशुतोष कस्तुरे ।कुंडल : पलूस तालुक्यात उपसा सिंचन योजनांमुळे हरितक्रांती दिसून येते आहे. कारण तालुक्यात जलसंधारण विभागाअंतर्गत अस्तित्वातील पाणी साठ्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. तालुक्यात एकूण १ सिमेंट नाला बंधारा, ४ गाव तलाव, तर ६ पाझर तलाव आहेत. यापैकी बहुतांश पाणी साठ्यांची स्थिती गंभीर स्वरुपाची आहे. जर या उपसा सिंचन योजना नसत्या, तर या तालुक्यालाही दुष्काळाचा सामना करावा लागला असता.
तालुक्यात एकूण १४ सहकारी पाणी पुरवठा संस्था आहेत, तर काही वैयक्तिक मालकीच्या संस्थाही नदीकाठी आहेत. त्याव्दारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु धरणातील पाणी कृष्णा नदीत सोडणे बंद झाले की या सिंचन योजनांवरही बंधने येतात. सध्या नदीमध्ये पाणी कमी असल्याने या योजनांही बंद होतील. म्हणजेच शाश्वत असा कोणताच पाण्याचा स्त्रोत नाही. मे महिन्याच्या काळात बहुतांशवेळा उपसाबंदीचा आदेश येतो, त्यावेळी मात्र शेतकऱ्यांची पळापळ सुरू होते.
पलूस तालुक्यात एकूण ३२ गावे, वाड्या आहेत. पैकी भिलवडी, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, वसगडे, तावदरवाडी, बुरुंगवाडी, ब्रम्हनाळ, खटाव, हजारवाडी, भिलवडी स्टेशन, पलूस, सावंतपूर, सांडगेवाडी, आमणापूर, अनुगडेवाडी, विठ्ठलवाडी, बुर्ली, रामानंदनगर, आंधळी, मोराळे, बांबवडे या २३ गावांत दुष्काळा जाहीर झाला आहे.तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक घेतले जाते. शेतीमध्ये शेतकरी सध्या आधुनिक शेतीकडे काहीअंशी वळत आहे. परंतु अजूनही जागरुक होणे आवश्यक आहे. पारंपरिक पीक पध्दतीला बगल दिली तरच भविष्यातील पाणी संकटातून तरणार आहे. ऊसाशिवाय गहू, हरभरा, ज्वारी ही कोरडवाहू पिके, तर हळद, सोयाबीन, केळी ही बागायती पिके घेतली जातात. याशिवाय सध्या येथील शेतकरी फूल शेतीकडे वळला आहे.४२ टक्के : पाणीसाठासर्व बाबींचा विचार करता, पलूस तालुक्यात एकूण पाणी साठ्यांची क्षमता १२४४ सहस्त्र घन मीटर आहे आणि उपलब्ध पाणी साठा केवळ ५१८ सहस्त्र घन मीटर इतका आहे. यानुसार ४२ टक्के इतका तालुक्यात पाणी साठा आहे.अस्तित्वातील पाणी साठ्यांबाबतची माहितीसर्व आकडे हजार घन मीटर (सघमी) मध्ये आहेत. (कंसात उपलब्ध क्षमता)गाव सिमेंट नाला बंधारा गाव तलाव पाझर तलावबांबवडे क्षमता ५,(००) — —मोराळे — क्षमता ५१ (२८) क्षमता २३६ (१८०)कुंडल — क्षमता १७९ (००) क्षमता १६० (००)सांडगेवाडी — — क्षमता २३० (२१०)(२ पाझर तलाव)तुपारी — — क्षमता २७४ (१००)पलूस — — क्षमता १०९ (००)ओलिताखालील क्षेत्रगाव संस्था क्षेत्रसंख्या (एकर)कुंडल ३ ५९०६दुधोंडी २ ८७०नागराळे ६ ८३२पुणदीवाडी १ १५पलूस १ १८८बांबवडे १ ९००एकूण १४ ८७११