बेजबाबदारीचा कळस : सांगलीत लसीकरण व कोरोना चाचणी एकाच इमारतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:00+5:302021-03-27T04:28:00+5:30

फोटो : 26dupate dummy photo १ : महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी प्रतीक्षेत असलेले नागरिक. 26dupate dummy photo 2 : ...

The peak of irresponsibility: Sangli vaccination and corona testing in the same building | बेजबाबदारीचा कळस : सांगलीत लसीकरण व कोरोना चाचणी एकाच इमारतीत

बेजबाबदारीचा कळस : सांगलीत लसीकरण व कोरोना चाचणी एकाच इमारतीत

Next

फोटो : 26dupate dummy photo १ : महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी प्रतीक्षेत असलेले नागरिक.

26dupate dummy photo 2 : आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करताना कर्मचारी.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या दहा आरोग्य केंद्रांत कोरोना चाचणी व लसीकरण एकाच छताखाली सुरू असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती असून लसीकरण व कोरोना चाचणी वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची गरज आहे.

महापालिकेच्या दहा आरोग्य केंद्रांसह काही दवाखान्यांत सध्या कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यातील आरोग्य केंद्रावर कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. आरटीपीसीआर व अँटिजनसाठीही नागरिक याच आरोग्य केंद्रावर येत आहेत. एकाच छताखाली चाचण्या व लसीकरण होत आहे. चाचण्यासाठी आरोग्य केंद्रात विशेष खबरदारी घेतली जात असली तरी धोका वाढण्याची भीती आहे. अनेक आरोग्य केंद्रात ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यात लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दिवसभरात लसीकरणासाठी एका केंद्रावर १०० ते १५० तर कोरोना चाचणीसाठी १० ते १५ जण येतात. एकाच परिसरात लसीकरण असल्याने कोरोना प्रसाराचा धोका वाढणार आहे.

चौकट

छत एकच, अंतर २०० मीटर

चाचणी करण्यासाठी आलेले रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिकांचे मार्ग वेगवेगळे नाहीत. तरीही आरोग्य केंद्राच्या इमारतीत लसीकरणाची प्रक्रिया केली जाते. तर कोरोना चाचणीची व्यवस्था केंद्राच्या बाहेरील बाजूला करण्यात आली आहे; पण या दोघांतील अंतर २०० मीटरही नाही. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट

महिला कुठे?

महिला व पुरुषांसाठी वेगळी नाही. एकाच ठिकाणी दोघांचेही लसीकरण होत आहे. काही आरोग्य केंद्रांत लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी दुसऱ्या मजल्यावर केली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली आहे.

चौकट

याला जबाबदार कोण?

महापालिकेने लसीकरण व चाचण्याबाबत दक्षता घेतली आहे. नागरिक व रुग्ण एकाच ठिकाणी येणार नाहीत, अशी व्यवस्था केली आहे; पण तरीही दोघे एकाच छताखाली येणार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या गंभीर स्थितीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: The peak of irresponsibility: Sangli vaccination and corona testing in the same building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.