कविता खोत यांच्या विरोधातील याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:04+5:302021-07-03T04:18:04+5:30
जत : बिळूर (ता. जत) येथील भाजपचे पक्षप्रतोद रामाण्णा जीवण्णावर यांनी पंचायत समिती सदस्या कविता खोत यांची खोटी सही ...
जत : बिळूर (ता. जत) येथील भाजपचे पक्षप्रतोद रामाण्णा जीवण्णावर यांनी पंचायत समिती सदस्या कविता खोत यांची खोटी सही व खोटी कागदपत्रे तयार करून खोत यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी पुरावा सादर केला होता. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे कविता खोत यांचे पंचायत समितीचे सदस्यत्व अबाधित राहिले आहे.
भाजपच्या पंचायत समिती सदस्या कविता खोत यांनी भाजपचे पक्षप्रतोद व पं. स. सदस्य रामण्णा जीवण्णावर यांच्यावर फसवणुकीबाबत जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जीवण्णावर यांनी बनावट व खोटी सही करून व खोटी कागदपत्रे तयार करून पंचायत समिती सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे खोटा पुरावा दिला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार खोत यांनी दि. २९ जानेवारी २०२१ रोजी जत पोलीस ठाण्यात केली होती.
जीवण्णावर यांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी भाजप पक्षाचा व्हीप सभापती, उपसभापती निवडीसाठी काढला होता. जीवण्णावर यांनी माझी फसवणूक करण्याच्या दृष्टीने भाजप पक्षाचा व्हीप काढून मला व्हीपची प्रत मिळाली म्हणून व्हीपवर मागच्या बाजूस नाव नमूद करून त्यासमोर खोटी व बनावट सही केली आहे, असे खोत यांचे म्हणणे होते.
खोट्या सहीच्या आधारे बोगस कागदपत्रे तयार करून व त्या सहीच्या आधारे जीवण्णावर यांनी सदस्यत्त्व रद्द करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जीवण्णावर यांचा अर्ज फेटाळून लावला.