-----------
विमा नसलेली वाहने रस्त्यावर
मिरज : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------
प्लॅस्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
सांगली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लॅस्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
------------
आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या
तासगाव : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
--------------
ताडीमध्ये रासायनिक द्रव्यांची भेसळ
शिराळा : तालुक्यात ताडी प्रसिद्ध आहे. मात्र काही नागरिक ताडीमध्ये रासायनिक द्रव्य मिसळून त्याची विक्री करीत असल्याचे प्रकार वाढत चालले आहेत.
----------
योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा
कडेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
-------------------
डासांचा प्रादुर्भाव वाढला
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे औषध फवारणीची मागणी होत आहे.
--------------
घर बांधकामाचा खर्च वाढला
मिरज : गेल्या दोन वर्षापासून सळी, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च वाढला आहे.
-----------------
पशु योजनांबाबत जनजागृती करा
जत : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
------------------
तंटे मिटविण्यात समित्या अपयशी
सांगली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण-तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत.
----------------
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
घाटनांद्रे : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे आजारांमध्ये वाढ झाली आहे.
----------------------
नियमित स्वच्छता करावी
आष्टा : शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे वाॅर्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
---------------
डुकरांचा बंदोबस्त करावा
आष्टा : शहरातील झोपडपट्टी परिसरातील काही भागामध्ये मोकाट डुकरे फिरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
--------
पाणपोई सुरू करावी
कुपवाड : मागील काही दिवसांपासून ऊनसारखे वाढत आहे. त्यातच संचारबंदी असल्यामुळे सर्वच बंद आहे. परिणामी शहरात येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. विविध चौकात पाणपोई सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
--------------