सांगली मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारातच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:07+5:302021-05-05T04:42:07+5:30
उपनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला सांगली : शहरातील उपनगरामध्ये अनेक गटारी तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
उपनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
सांगली : शहरातील उपनगरामध्ये अनेक गटारी तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहराच्या उपनगराधमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
सांगली : गेल्या दोन वर्षांपासून सळी, सिमेंट, वाळू, विटा व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.
भरधाव वाहनांवर कारवाई करा
सांगली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. संचारबंदी असतानाही कॉलेज कॉर्नर ते माधवनगर मार्गावर सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागात रॉकेलचा पुरवठा करा
सांगली : ग्रामीण भागामध्ये ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना रॉकेलचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागात अनेकवेळा रात्री विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रॉकेल नसल्यामुळे नागरिकांना अंधारातच थांबवे लागत आहे. या अंधारातून मुक्त करण्यासाठी महिना पाच लिटर तरी रॉकेल मिळावे, अशी ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे.